राष्ट्रीय पातळीवरील एक दिवसीय वेबिनारचे आयोजन "कोरोणामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, यावरील उपाय तसेच शिक्षणातील विविध संधी."*
कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे *शनिवार, दि.२५ जुलै २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता* महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील एक दिवसीय वेबिनारचे आयोजन केले आहे.
विषय : *"कोरोणामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, यावरील उपाय तसेच शिक्षणातील विविध संधी."*
वक्ते : *मा. श्री. प्रल्हाद वामनराव पै.* ( थोर तत्वचींतक सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे सुपुत्र).

🏻 सरांचा थोडक्यात परीचय : एक उच्चविभुषीत व्यक्तीमत्व. मा. प्रल्हाद पै. सरांनी आय.आय.टी., पवई येथून बि. टेक. तसेच सेठ जमनालाल बजाज, मुंबई येथे Master Of Management. त्याचबरोबर टी. क्यू. एम., जपान. अश्या पदव्या सरांनी संपादन केलेल्या आहेत आणि सर जीवनविद्या मिशनचे आजीवन सदस्य असून, ते नेहमीच युवकांसाठी युवा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक म्हणुन ओळखले जातात. तरी सर्व विद्यार्थ्यी तसेच पालक, प्राध्यापक यांनी या ऑनलाईन वेबिनार मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. वरील लिफलेट मध्ये रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे. त्याचबरोबर Telegram link सुध्दा दिली आहे तरी त्वरीत रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावे ही नम्र

विनंती.
आयोजक
प्राचार्य,
डॉ.प्रकाश क. बनमेरू
कै.कु.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार
समन्वयक
स.प्रा.शिवशंकर मोरे
*महत्त्वाचे :-* सदर वेबिनार हा YouTube वर पाहता येईल यासाठी लिंक एक दिवसांपुर्वी Telegram तसेच ग्रुपवर पाठविण्यात येईल त्याचप्रमाणे ई-प्रमानपञ (10 दिवसात ) आपल्या मेलवर पाठवण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Contact Us
LATE KU. DURGA K. BANMERU
SCIENCE COLLEGE, LONAR DIST. BULDANA