कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय ,लोणार*
प्रवेश प्रकिया
*बी. एस्सी. भाग-१* व *बी.व्होक भाग-१* - *Toursim and Hospitality Management* *शैक्षणिक सत्र २०२०-२०२१* नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, राज्यात कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावा मुळे संपूर्ण महाराष्ट्रभर लॉक डाउन आहे . सध्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावा मुळे आपले सामान्य जनजीवन बदलले आहे. या अनुषंगाने सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या ऑनलाइन व्यासपीठा द्वारे महाविद्यालय आपणापर्यंत येत आहे. आपण या द्वारे घरी बसून कै.कु. दुर्गा क .बनमेरू विज्ञान महाविद्यालय , लोणार , जिल्हा - बुलडाणा येथे पदवी अभ्यासक्रम (बी. एस्सी. भाग-१ व बी.व्होक भाग-१) शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ करीता तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश नोंदणी करू शकता. सदर सुविधा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून महाविद्यालया द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश-नोंदणी प्रकीयेच्या माहिती करिता आपली नोंदणी करून घ्यावी. नोंदणी केल्या नंतर आपणास महाविद्यालयामार्फत whatsapp group वरून प्रत्यक्ष प्रवेश प्रकीया बद्दल सविस्तर माहिती कळविण्यात येईल, या फॉर्म द्वारे आपण फक्त प्रवेश प्रकीयेच्या माहिती करिता नोंदणी करीत आहात. आपणाला प्रवेश निश्चित करण्यासाठी whatsapp द्ववारे वेळोवेळी कळविण्यात येईल.